Best Practice
मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग
शैक्षणिक वर्ष २०२४- २५ सालात इतिहास विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता चालू सालात मोडी लिपी या दुर्मिळ व दुर्लक्षित लिपीची ओळख विद्यार्थ्यांना होण्याकरिता महावीर महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाचा कालावधी १० दिवसाचा होता. (०३/०२/२०२५ ते १३/०२/२०२५) यामध्ये एकूण १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदरच्या प्रशिक्षण वर्गात मोडी लिपीची ओळख, बाराखडी, जोडाक्षरे, वाक्यरचना आदी विविध घटक शिकवण्यात आले. सदरच्या प्रशिक्षण वर्गाचे अध्यापन इतिहास विभागातील प्रा. चंद्रशेखर काटे आणि प्रा. उत्तम वडींगेकर यांनी केले.
या उपक्रमातील प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी तहसील, तलाठी कार्यालय, पुरालेखागार याठिकाणी जाऊन मोडी लिपीतील जुन्या दस्तावेजांचे परिक्षण, वाचन व लिप्यांतर केले.
|